
कणकवली:सावंत फाउंडेशन संचालित डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र हे शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. याही वर्षी अश्याच विविध शैक्षणिक आणि सामजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे योजिले आणि या नवीन वर्षाचा शुभारंभ हा २० जानेवारी पासून होणाऱ्या आकाश दर्शन या कार्यक्रमा पासून होणार आहे.
अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात दडलंय काय? खरं तर हे जाणून घ्यायची उत्सुकता ही प्रत्येकालाच असते पण ते जाणून घेणे हे सहसा शक्य नाही. पण हे शक्य झालंय डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आयोजित आकाश दर्शन कार्यक्रम मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक, पालक, आणि विद्याथ्यांसाठी अगदी मोफत स्वरूपात हा संपुर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ स्थानिक, तालुक्यातील शिक्षकांनी पालकांनी व विद्यार्थ्यांनी , घ्यावा असे आवाहन सावंत फौंडेशन मार्फत करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम प्रामुख्याने शिवडाव हायस्कूल २० जानेवारी २०२३ तसेच २१ जानेवारी २०२३ कळसुली हायस्कूल येथे पार पडणार आहे.
या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे...
संध्याकाळी 5 ते 6 कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दिवा प्रज्वलनाने सुरवात आणि थोडक्यात सावंत फौंडेशन च्या कार्याचा आढावा
1. दुर्बिणीची ओळख , कशी वापरायची त्याची माहिती. ६. ०० ते ६:३०
2. आकाश कसे पाहावे त्याची माहिती ६:३०ते ७:३०
3. आकाशदर्शन - संध्याकाळचे आकाश - पश्चिमेकडून सुरुवात करून, राशी, नक्षत्रे, तारे, तारकासमूह ओळखणे ७:३० ते ८:३०
4. दुर्बिणीतून काही खास खगोलीय वस्तू पाहणे ८:३० ते ९:३०
5. (मध्यंतर) जेवणाची सुट्टी साधारण एक तास. ९:३०१ ते १०:३०
6. स्लाईड शो १०:३० ते ११:३०
7. आकाशदर्शन - रात्रीचे आकाश - ११:३० ते १२:३० चहापान
8. दुर्बिणीतून आकाशदर्शन - १:००ते २:००
9. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम - २:००ते ३:०० चहापान
10. आकाशदर्शन- सकाळचे आकाश - ३:०० ते ४:००
11. दुर्बिणीतून आकाशदर्शन ४:०० ते सूर्योदयापर्यंत
आजच आपले नांव निश्चित करण्यासाठी खालील गुगल लिंक वर जावून खालील दोन पैकी एका शाळेत आपले नाव सुनिश्चित करावे.
शिवडाव हायस्कूल साठी लिंक :-
https://forms.gle/Yi76MvYu6YSBGQdX7
कळसुली हायस्कूल साठी लिंक:-
https://forms.gle/ajdEcJCZkcBziqKJ6
नावं नोंदणीची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023
या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हातील इतर तालुक्यातील उर्वरित शाळांमध्येही आम्ही कार्यक्रम करणार आहोत आपलं सहकार्य आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावयाला नक्कीच हातभार लागण्यास उपयुक्त ठरेल. त्यामुळे सावंत फोंडेशन तर्फे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यावर भर दिला जाईल याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाना सहभाग नोंदवून घेता होईल.
अधिक माहितीसाठी
विशाल गुरव सावंत फौंडेशन प्रोग्रॅम सहकारी मोबाईल नंबर 8275187062
ई-मेल आयडी sawantfoundationorg@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा.