
सावंतवाडी : ओटवणे येथील साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकानं राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. कापईवाडी येथील हा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला. त्या युवकाचे वडील मोलमजूरी करत असून नेहमीप्रमाणे आजही ते मोलमजूरी करण्याकरीता गेले होते. तर आई सावंतवाडी येथे बाजाराला गेली होती. याच वेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने माजघरात गळफास लावून घेतला. साहिल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.