सावंतवाडीतील युवतीला तब्बल 5 लाखांचा गंडा

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 16:47 PM
views 306  views

सावंतवाडी : ऑनलाईन काम देतो असे सांगून सावंतवाडीतील युवतीची अज्ञाताने तब्बल पाच लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत तिला टास्क देवून ही फसवणूक करण्यात आली, असे तिचे म्हणणे आहे. सर्वोदयनगर-सावंतवाडी येथील ही युवती असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार गंडा घालणाऱ्या अज्ञातावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहीती अशी की, संबधित युवतीला अज्ञाताकडुन फोन आला होता. यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला सबस्क्रायबर्स वाढविण्याचे काम करावे लागेल त्यासाठी टास्क पुर्ण करावे लागतील, असे सांगून काम करण्यास सांगितले. तसेच ऑनलाईन लिंक टाकून वैयक्तीक आणि खात्याची माहीती घेतली. त्यानंतर आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी केली व आपली फसवणूक झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञाता विरोधात येथिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे