मशवी रस्त्यावर रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह

अपघात की घातपात ?
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 18, 2023 11:52 AM
views 1187  views

देवगड : मशवी मुणगे या रस्त्यावर रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर चारचाकी गाडीच्या काचा फोडलेल्या दिसत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घातपात झाल्याच्या शक्यतेने सुरु केला आहे. 


 अपघात झालेल्या अवस्थेत कार आढळून आली आहे. यातील युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे. गाडीचा पुढील दरवाजा उघडा असून काचीवर ,बोनेटवर दरवाजावर आघात केल्या सारख्या खुण दिसून येत आहेत. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.


घटनास्थळी उपविभागीय अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस ननिरीक्षक नीलकंठ बगळे, पो.उ सूधीर कदम,राजेन जा धव ,प्रसाद आचरेकर,स्वप्नील भोवर,स्वप्नील ठोबरे,यांसहडाग स्कॉड, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर युवक मिठबांव येथीलप्रसाद परशुराम लोके असल्याचे समजते.