
सावंतवाडी : येथील कोलगाव मारुती मंदिरच्यामागे काही अंतरावर असलेल्या शेत विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. काजल राजन कुंभार (वय ४३, रा. कोलगाव कुंभारवाडी) असे तिचे नाव असून ती शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू होता.
त्यानंतर शनिवारी दुपारी तिचा मृतदेह या शेत विहिरीत निदर्शनास आला. याबाबतची खबर तिचे दीर दीपक कुंभार यांनी सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेत आहेत.