
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे जवळील, नांदगाव गोसावीवाडी येथील सुनिता परशुराम पवार, (वय ६० वर्षे) यांना डोक्यात अज्ञाताने गॅस सिलेंडर घालून ठार मारले आहे. आणि त्यांच्या अंगडावरील दागिने चोरीस गेले आहेत. काल मंगळवार, ता.२७ ऑगस्ट, दहीहंडी उत्सवानिमित्त पती परशुराम पवार आणि वाडीतील शेजारी बाहेर गेले होते. यासंधीचा फायदा घेत, सायंकाळी ६.३० वाजण्याचे दरम्यान हा दरोडा घालत दागिने लुटून नेले आहे. घरात पडलेल्या सुनिता यांच्या अंगावर केवळ परकर आणि ब्लाऊझ होते. अंगावरील साडी घरापासून लांब नांदगाव रस्त्याच्या पलिकडे सापडली आहे. घटनास्थळी मृतदेहा शेजारी सिलेंडर पडलेला होता. सुनिता यांचे पती परशुराम पवार हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून मुलगा मुंबई पोलीस मध्ये अधिकारी आहे. सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्या दाखल करण्यात आला असून, डिवायएसपी श्री. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.