
वैभववाडी : तालुक्यातील उंबर्डे या गावी रविवारपासून आठवडा बाजार भरणार आहे. दर रविवारी हा बाजार भरणार असून दि. ६ नोव्हेंबर रोजी याची सुरूवात होणार आहे. नागरिकांना या बाजाराला उपस्थित राहून खरेदी करावी, असे आवाहन उंबर्डे सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी केले आहे.
उंबर्डे गावासह पंचक्रोशीतील गावांसाठी खरेदीसाठी रविवारपासून उंबर्डे येथे आठवडी बाजार भरणार आहे. ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणावर हा बाजार भरला जाणार आहे. भाजीपाल्यासह सर्व प्रकारच्या वस्तू विकणारे व्यापारी याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकाच ठिकाणी ग्राहकांना सर्व वस्तूंची खरेदी करता येणार आहे. ६ नोव्हेंबरपासून दर रविवारी हा आठवडा बाजार भरवला जाणार आहे. यामुळे उंबर्डे, कोळपे, वेंगसर, तिथवली, कुसुर, मांगवली, भुईबावडा या गावांसह आजूबाजूच्या गावांना याचा फायदा होणार आहे. नागरिकांनी खरेदीसाठी या बाजारात यावे, असे आवाहन श्री. बोबडे यांनी केले आहे.