
देवगड : पावणाई येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटन पावणाई सरंपच सुहास लाड यांनी केले. यानंतर पावणाई गांव OdF+ मॉडेल झाल्याबद्दल पाणी व स्वच्छता समुह समन्वयक विनायक धुरी यांच्या हस्ते सरपंच सुहास लाड यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले . यावेळी उपसरपंच नरेश लाड , माजी सरपंच गोविंद उर्फ पप्पू लाड , ग्रा. प सदस्य विठोबा प्रभु , रविंद्र मेस्त्री ,मधुरा घाडी , पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर , माजी तंटामुक्त अध्यक्ष दिलीप लाड , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी घाडी , मुख्याध्यापक मेथर मॅडम , बचत गट प्रतिनिधी प्रज्ञा घाडी , सीआरपी राखी लाड , आरोग्य सेविका हेमा म्हापसेकर , आशा विद्या सावंत , बाळा टुकरूल , ग्रामसेवक आर .जी. पेडणेकर , लाभार्थी , ग्रामस्थ व विदयार्थी उपस्थित होते .
यावेळी केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, पीएम आवास योजना, पीएम भारतीय जन औषधी योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, जल जिवन मिशन , मनरेगा ,आदी विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली . तसेच शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन द्वारे केंद्र व राज्य शासनांचे योजना दाखवण्यात आले .
या कार्यक्रमाला लाभार्थ्यांनी मुलाखत देत शासनाचे आभार मानले . या कार्यक्रमात आरोग्य सेविका हेमा म्हापसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक आर.जी. पेडणेकर तर आभार माजी सरपंच पप्पु लाड यांनी मानले .