
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांताचं ५९ वं कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत होत असून यानिमित्ताने भव्य शोभायात्रा मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाकडे या शोभायात्रेच जंगी स्वागत करण्यात आले. तसेच शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कोकण प्रांतातील जिल्ह्यांसह गोवा येथील विद्यार्थ्यी यात सहभागी झाले होते.
शहरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला. कोकण प्रांतातील जिल्ह्यांसह गोवा येथील विद्यार्थ्यी यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाकडे या शोभायात्रेच जंगी स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी यात्रेच स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अजय गोंदावळे, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, चंद्रकांत जाधव, गुरू मठकर, प्राजक्ता केळुसकर, महेश धुरी, संदीप हळदणकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शेकडो जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते.