
दोडामार्ग : आंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळल्याने राजाराम निळू साटेलकर यांचे नुकसान झाले आहे. सुदैवानै यात कोणीही जखमी झाले नाही. दोडामार्ग तालुक्यात शनिवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तिलारी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.आंबडगाव येथे शनिवारी रात्री राजाराम साटेलकर यांच्या घराची भिंत कोसळली. काही पत्रे फुटले. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.