
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन गुरुवार २७ फेब्रुवारीला इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता करण्यात आले आहे.
पत्रकार तथा नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेनंतर तात्काळ पारितोषिक वितरण केले जाणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आणि पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गावस उपाध्यक्ष हेमंत मराठे सदस्य तथा स्पर्धा नियोजन प्रमुख गुरुनाथ पेडणेकर सचिव मयूर चराटकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष दीपक गावकर माजी अध्यक्ष राजेश मोंडकर सचिन रेडकर हर्षवर्धन धारणकर दिव्या वायंगणकर नागेश पाटील, मंगल कामत नरेंद्र देशपांडे राजू तावडे प्रवीण परब, विश्वनाथ नाईक,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे शैलेश मयेकर आनंद धोंड रुपेश पाटील रुपेश हिराप, प्रसन्न गोंदावळे आदींसह तालुका कार्यकारणी आणि सदस्य यांची उपस्थिती असणार आहे. पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे. सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये दोन गट सहभागी होणार असून पहिल्या गटामध्ये पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा होणार आहे. यामध्ये 'पुस्तक माझा खरा मित्र' आणि 'मोबाईल मुळे बालपण हरवत आहे का?' हे दोन विषय देण्यात आले असून स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दुसऱ्या गटामध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होणार असून या गटासाठी 'मराठी राजभाषे समोरील आव्हाने' आणि 'मराठी भाषा विकासात माझी भूमिका' हे विषय देण्यात आले आहेत. विजेत्यांना रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.