
सावंतवाडी : शहरातील समाजमंदिर परिसरात वारंवार अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट सुमारे पन्नास फूट उंचीच्या टाकीवर चढत निषेध व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधून देखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचं त्यांचे म्हणणे आहे.
माजी नगरसेवक विलास जाधव सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या टाकीवर चढून आंदोलन छेडले आहे. जो पर्यंत ही टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही तो पर्यत खाली उतणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सावंतवाडी समाज मंदिर पाठीमागे समाज मंदिर व गरड परिसराला पाणी पुरवठा करणारी टाकी आहे. अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरीकांच्या तक्रारीने त्रस्त झालेले माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट टाकीवर चढत निषेध व्यक्त केला. जो पर्यंत ही एक लाख लिटरची टाकी भरत नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही. माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहिलं असा इशारा माजी नगरसेवक विलास जाधव यांनी दिला.