
सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जुन्या वर्तमानपत्रांचा पुनर्वापर करून कागदी पिशव्या कशा बनवाव्यात यांचे मार्गदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी केले. विद्यालयात स्वच्छता मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करून समाजाला संदेश देण्याचे काम सुरू आहे.विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे व प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणाम व प्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कडून सावर्डे परिसरात प्रयत्न केले जात आहेत. समाजाला कागदी पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाचे संवर्धन होण्यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले व सात हजार पेक्षा जास्त कागदी पिशव्या तयार करून सावर्डे बाजारपेठेतील विविध दुकानांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले व स्वच्छता मोहिमेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने राबविला. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानांतर्गत राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्रचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर सर्व शिक्षक व पालकांनी विशेष अभिनंदन केले आहे. कागदी पिशव्या तयार करताना विद्यार्थी व सावर्डे बाजारपेठेत पिशव्यांची वाटप करताना