सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये अनोखा उपक्रम | विद्यार्थ्यांनी घेतला ' मास्टर शेफ ' बनण्याचा आनंद

आरोग्यदायी पाककला कृती बनवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: December 04, 2022 15:15 PM
views 393  views

सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत आरोग्यदायी पाककला कृती बनवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. प्रशालेतील केजी विभाग व इ. १ ली ते १०वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या उपक्रमात विविध चविष्ट पदार्थ बनवले.

यामध्ये विद्यार्थांनी भाज्या व फळे वापरून सँडविच, फळांचे ज्यूस, बिस्किट केक,  बिस्किट सँडविच, भेळ, पाणीपुरी, दाबेली, मिल्कशेक, कॉफी, लिंबू सरबत, व्हेज फ्रॅन्की, कोशिंबीर, केळ्याचे शिकरण  इ . पदार्थ शिक्षकांच्या मदतीने बनवले. तसेच  विद्यार्थ्यांनी या पदार्थांची सुंदर सजावट करून अतिशय चांगल्याप्रकारे त्यांचे सादरीकरण केले.

यावेळी सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापूरी,  उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सचिव हिदायतुल्ला खान , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले .