सिनेमा टॉकीज जवळील रस्त्यावर झाड कोसळलं ; सामाजिक बांधिलकी - न. पं. कर्मचाऱ्यांनी हटवलं

Edited by: विनायक गावस
Published on: July 21, 2023 20:13 PM
views 139  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील सिनेमा टॉकीज जवळील एक मोठा आंब्याचे झाड मुळासकट तुटून रस्त्यावर कोसळले.  सुदैवाने जीवित हानी टळली. यासाठी सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीमने  व नगरपरिषदे अधिकारी दीपक म्हापसेकर, वर चढून झाड तोडणारा पालिकेचा कर्मचारी आंबेडकर , इतर कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी रस्त्यावरचे झाड काही वेळेतच तोडून  रहदारीस मार्ग मोकळा करून दिला. ट्राफिक मोठ्या प्रमाणे वाढलं होतं याकरिता ट्राफिक पोलीस राजाराम राणे यांनी दखल घेऊन रहदारी सुरळीत केली.

याकरिता सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, शाम हळदणकर, दीपक सावंत ,सुजय सावंत सतीश बागवे, सुरेश सुरेश भोगटे, रवी जाधव यासाठी हातभार लावला.