कणकवलीत ट्रकवर पडलं झाड...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 24, 2023 13:28 PM
views 95  views

कणकवली : कणकवली कॉलेज रस्त्यावर ट्रकवर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. लक्ष्मी विष्णू हॉलच्या समोर ट्रक जात असताना अचानक त्या ट्रकवर झाड पडले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पण वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले असून, झाड बाजूला करण्याचे काम नगरपंचायत कर्मचारी करत आहेत.