गॅरेज समोरचा वृक्ष कोसळला | गाड्यांचं नुकसान

Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2024 11:30 AM
views 78  views

सावंतवाडी : सावंतवाडी ओटवणे मार्गावर कशाळीकर गॅरेजच्या समोर असलेला जीर्ण वृक्ष सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वृक्षाच्या फांद्या पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकी व अन्य गाड्यावर पडल्यामुळे गाड्यांचे मोठ्या नुकसान झाले. वृक्ष वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वाहिन्या तुटल्या. त्यामुळे या परिसरातील महावितरणची बत्ती गुल झाली. हा वृक्ष त्वरित हटवावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.