कणकवली घरावर झाडाची फांदी पडून नुकसान...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 12, 2023 19:10 PM
views 467  views

कणकवली : कणकवली शहरातीलतील फौजदारवाडी येथील नवनीत बागवे यांच्या राहत्या घराच्या मागच्या पडवीवर  ११ ऑगस्ट  रोजी रात्री आंब्याच्या झाडाची मोठी  फांदी वाऱ्याने पडली. सुदैवाने पडवीच्या शेजारी काहीजण झोपले होते त्यांना कोणतीही ईजा झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.