विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ देवगडात मशाल रॅली

नितीन बानगुडे पाटील काय बोलणार याकडे लक्ष
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 27, 2024 11:48 AM
views 267  views

देवगड : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ नितीन बानगुडे पाटील यांची देवगड येथे जाहीर सभा होणार आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ श्री पाटील हे देवगड येथे येत आहेत. जामसंडे ते देवगड या मार्गावर भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी देवगड शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

या रॅलीला जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक, अतुल रावराणे यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.