
सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर हा समाजात पर्यावरण व निसर्गप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो नेहमी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचे धडे गिरवत आसतो. आज ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन या दिनाचे औचित्य साधून कबीरने आपल्या शिक्षकांना एक वेगळी अशी भेट दिली. कबीरने शाळेतील प्रत्येक शिक्षकाला एक एक रोपटे दिले विशेष म्हणजे या रोपांना लावण्यासाठी त्याने " टाकाऊ पासून टिकाऊ" ह्या संकल्पना साकारत त्याने प्लास्टिकचे डबे, काचेच्या बरण्या, शित पेयाची बॉटलस अशा गोष्टींचा वापर केला.
त्याची ही वेगळी संकल्पना शिक्षकांना खूप आवडली व भविष्यात आपण पण अश्या वस्तुचा योग्य वापर करु असे सांगितले. यावेळी प्रा.बाळासाहेब नंदीहळ्ळी यांसह शिक्षकवर्ग उपस्थित होता.