
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील कुडाळ - पाट मार्गावर काल रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळहून पाट गावाकडे जाणाऱ्या एका कारला करमळगाळू येथील एका तीव्र वळणावर अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन धडकली.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचा चक्काचूर झाला. या गाडीत एकूण दोघे जण प्रवास करत होते, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. निवती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.