
सावंतवाडी : सरमळे येथे एका रात्रीत हजारो भाविक ग्रामस्थ आणि ब्राह्मणांच्या मंत्रघोषात मंदिर उभारण्यात आले आहे. देवीच्या कौलानुसार आणि ग्रामस्थांनी केलेल्या निश्चयानुसार पहाटे पर्यंत हे मंदीर पूर्ण करण्यात आले. पांडवकालीन हे मंदीर पांडवांनी एका रात्रीत बांधले होते.
ते अपूर्ण काम सध्याच्या काळातील शेकडो पांडव यांनी केल असून शेकडो गवंडी कामगार काम करीत होते. यावेळी लोकांत एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह संचारला होता. यावेळी मंदिर परीसर भाविकांच्या अलोट गर्दीत फुलून गेला होता. यावेळी मंदिराला तीर्थक्षेत्राच स्वरूप प्राप्त झाले होते. हजारो भाविक या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. याप्रसंगी माजी आमदार शिवराम दळवींसह शेकडो शिवभक्त उपस्थित होते.महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे.