उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची टीम रूग्णसेवेत...!

जनतेनं गैरसमज दूर करावा ; वैद्यकीय अधिक्षकांच आवाहन
Edited by: विनायक गावस
Published on: November 10, 2023 16:21 PM
views 625  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून शिक्षण घेऊन आलेले एकूण आठ पीजी डॉक्टर सेवा देत आहेत. सेवा देणारे हे डॉक्टर शिकाऊ नाही आहेत. एमडी, एमएस करणारे हे डॉक्टर असून एमबीबीएस होऊन दोन-दोन वर्षे सेवा दिलेले डॉक्टर आहेत. ते शिकाऊ आहेत हा गैरसमज जनतेने दूर करावा, त्यांना सहकार्य करावं. सहा महिन्यांनी परिक्षा झाल्यावर हेच डॉक्टर आपल्याकडे पुर्णवेळ सेवेत रुजू होतील अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.

यामध्ये डॉ. आयुष सेठी (एमएस ऑर्थो), डॉ. चिन्मय डाकलिया (एमडी मेडिसिन), डॉ. वैभव बिसने (एमडी मेडिसिन), डॉ. अमशुला कोचेरू (एमएस जनरल सर्जरी), डॉ. श्रद्धा वोहरा (एमएस ओब-गायन),डॉ. गायत्री कुप्पुसामी (एमडी रेडिओडायग्नोसिस), डॉ. विधी मोदी (एमडी पॅथॉलॉजी), डॉ. योगेश्वरी (एमडी ऍनेस्थेसियोलॉजी) असे आठ डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. रूग्णसेवेसाठी ते सध्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून त्यांनी शिक्षण घेतल असून एमडी, एमएस हे पुढील उच्च शिक्षण ते घेत आहेत.

दरम्यान, वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी याबाबत जनतेला आवाहन केल आहे. हे डॉक्टर शिकाऊ नाही आहेत. एमडी, एमएस करणारे असून एमबीबीएस होऊन दोन-दोन वर्षे सेवा केलेले आहेत. ते शिकाऊ आहेत हा गैरसमज जनतेने दूर करावा, त्यांना चांगलं सहकार्य केलं तर सहा महिन्यात परिक्षा झाल्यावर ते पुर्णवेळ सेवेत रुजू होतील. त्यांना चांगलं सहकार्य कराव ते तज्ञ डॉक्टर असून त्यांची अवहेलना होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, सावंतवाडीची संस्कृती ही आदरातिथ्याची आहे. उपजिल्हा रुग्णालयात जनतेला चांगली सेवा देण्याच काम आम्ही करू असं आवाहन डॉ. ऐवळे यांनी केल आहे. तर अशा प्रकारच्या पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर्ती मोठमोठी केईम, जेजे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सीपीआर हॉस्पिटल, मिरज मेडीकल कॉलेज आदी महाराष्ट्रातील अनेक मोठी हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेज ही सर्व हॉस्पिटल अशा डॉक्टरांच्या जीवावर चालतात असंही ते म्हणाले.याप्रसंगी डॉ. गिरीश चौगुले उपस्थित होते.