
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या मध्यभागी हे भगदाड पडल आहे. येथील रहिवासी बंटी माठेकर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी याबाबत नगरपालिकेचे लक्ष वेधले आहे. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल भगदाड तात्काळ बुजवून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती त्यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला केली आहे.