
सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त सावंतवाडी शहरात भरत कॅरम मंडळाने कॅरम स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बारा वर्षाखालील मुली प्रथम आरोही सावंत ,१४ वर्षाखालील मुलीत प्रथम आस्था लोंढे, १२ वर्षाखालील मुलगे प्रथम भरत सावंत, १४ वर्षाखालील मुलगे प्रथम प्रतीक बीरोडकर यांनी क्रमांक पटकावले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भरत कॅरम मंडळाने शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत कॅरम स्पर्धा आयोजित केली होती.या कॅरम स्पर्धेची बक्षिसे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर कॅरम बोर्ड दिलीप वाडकर यांनी पुरस्कृत केले होते .या स्पर्धेमध्ये बारा वर्षे खालील मुलीत प्रथम आरोही सावंत( आरपीडी), द्वितीय सानवी साधले (आरपीडी), तृतीय श्रावणी पडते (आरपीडी), १४ वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम आस्था लोंढे (मिलाग्रीस हायस्कूल), द्वितीय आनम खान (सेंट्रल हायस्कूल), तृतीय समृद्धी मडगावकर (मदर क्वीन), चतुर्थ स्वरा धुरी (भोसले नाॅलेज सिटी) यांनी यश प्राप्त केले. १२ वर्षे खालील मुलगे प्रथम भरत सावंत (कळसुलकर), द्वितीय यश चव्हाण (भोसले नाॅलेज सिटी),तृतीय आयुष पाटील (खांडेकर विद्यालय) तर १४ वर्षाखालील मुलगे प्रथम प्रतीक बीरोडकर (आरपीडी), द्वितीय विभव राऊळ (मदर क्वीन), तृतीय स्मित सावंत (मदर क्वीन ),चतुर्थ लिखित भानुषाली यांनी क्रमांक पटकावले. स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर,सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, पूजा नाईक, गीता सुकी ,शिवानी पाटकर, ज्योत्स्ना सुतार, विश्वास घाग ,संजय गावडे, श्री हळदणकर आदी उपस्थिती होते तर उद्योजक शैलेश पै , उद्योजक राजू भालेलकर,भरत कॅरम मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत,पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला .यावेळी अश्फाक शेख व अरूण घाडी आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन केले. भरत कॅरम मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांनी पाहुणे, विद्यार्थी, शिक्षक,पालक आदींचे स्वागत करून कॅरम खेळाडू निर्माण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.