
सावंतवाडी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची शाखा सावंतवाडी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. मधुभाईंना विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व आशीर्वाद घेतले. सावंतवाडीतील साहित्यिक उपक्रमांसह इतर विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी कोमसाप सावंतवाडी शाखा उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, चिरंजीव अनुप कर्णिक, सदस्य विनायक गांवस आदी उपस्थित होते.