
सावंतवाडी : काल रात्री सावंतवाडी बस स्टैंड वर पायाला झालेल्या जखमी अवस्थेत पडलेल्या सोनुर्ली येथील बेवारस रवींद्र देसाई नाम वृद्धाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून व सामाजिक संस्था मुस्लिम हेल्प अँड वेल्फर फाउंडेशन सावंतवाडी तसेच सोनुर्ली गावातील ग्रामस्थ दिनेश सोनुर्लीकर यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
डॉक्टरच्या सल्ल्याने आज त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरस येथे दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिले.