
मालवण : मालवण हडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश हरी आस्वलकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, संतोष कोदे, ग्रामपंचायत सदस्य आनंद रावले, ज्ञानेश सुर्वे, अमोल गांवकर यांसह हडी मधील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.