
मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारपासून कोकण दौरा सुरू होणार आहे. कोकण ही उत्तमोत्तम कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जाते, तेव्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवभूमीत राज ठाकरे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्याच्या हेतूने मालवण चीवला बीच येथे मनसे नेते शिरीष सावंत, मनसे सरचिटणीस आमदार परशुराम उपकर, मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार रविराज चिपकर हे गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी राज ठाकरे यांचे भव्य दिव्य वाळू शिल्प रेखाटणार आहेत. मनसेच्या गणेश कदम यांनी सिंधुदुर्गवासीयांना हे वाळू शिल्प बघण्यासाठी मालवण चिवला बीच येथे यावे, असे आवाहन केले आहे.