देवगड इथं खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 07, 2024 08:35 AM
views 358  views

देवगड : देवगड तालुक्यातील देवगड बंदरात यशवंत नारायण खांदारे यांच्या नौकेवर काम करणारा खलाशी प्रकाश विद्याधर प्रधान वय (२४) यांच्या पोटात दुखू लागल्याने येथील जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला ही घटना बुधवार ५ जून रोजी पहाटे २:१५ च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड बंदरातील यशवंत नारायण खांदारे (रा राजकोट मालवण)यांच्या नौकेवर काम करणारा खलाशी प्रकाश विद्याधर प्रधान (मूळ राहणार, कणसार ओडिसा, सद्या राहणार देवगड) वय (२४) यांच्या अचानक पोटात दुखू लागल्याने जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला.

ही घटना बुधवार ५ जून रोजी पहाटे २:१५ च्या सुमारास घडली.या घटनेची फिर्याद नौका मालक यशवंत खांदाळे यांनी देवगड पोलिस स्टेशन मध्ये दिली असून देवगड पोलिसानी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. असून याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.