
वैभववाडी : अर्जुन रावराणे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.१००टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.या विद्यालयाची मानसी चव्हाण व प्रिती रावराणे तालुक्यातील अनुक्रमे द्वितीय व तृतीय आली आहे.शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला.या परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.विद्यालयातून
परीक्षेस ४९विद्यार्थी बसले होते.हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. -मानसी अ.चव्हाण (९६.८०टक्के) ही विद्यालयात प्रथम व तालुक्यात द्वितीय आली. तर प्रिती नितीन रावराणे (९६.६०टक्के)गुण मिळवून विद्यालयात द्वितीय व तालुक्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.तर वैष्णवी भास्कर नादकर हीने (९५.८०टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.