
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या वन्य हत्तींनी आपला मोर्चा कुंभवडे, ता. दोडामार्ग येथे हलविला आहे. या हत्तींनी तेथे एका रात्रीत केळी, सुपारी व नारळ बागायतींच मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती पहिल्यांदाच या भागात पोहचल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.