
कणकवली : शहरात शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास कणकवली पटवर्धन चौकात एका राजकीय पक्षाच्या व युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. यामध्ये त्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वाहन पार्किंग कारणावरून हा वाद होवून त्याचे रुपांतर मारहाणीत झाल्याची चर्चा आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पटवर्धन चौकात शनिवारी संध्याकाळी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपल्या ताब्यातील वाहन पार्किंग केले,त्याचा अडथळा निर्माण संबंधित युवकांच्या वाहनांना झाला. त्यावेळी त्या युवकांनी वाहन बाजूला करा, अडथळा होत असल्याचे सांगितले. मात्र त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याने काही वेळात वाहन बाजूला केल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली,त्या पदाधिकाऱ्याला समोरील युवकाच्या कानाखाली लागवले. त्या युवकांनी त्या पदाधिकऱ्याला मारहाण केली.ही घटना कणकवली शहरातील मुख्य चौकात घडल्याने मोठी चर्चा शहरात रंगली आहे.