
सावंतवाडी : शहारातील मुख्य रस्त्यावर मधोमध भला मोठा खड्डा पडला असून नगरपरिषद प्रशासनाच्या डोळ्यांना काही तो दिसत नाही आहे. हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत असून वाहन चालकांना मोठी हानी पोहचवू शकतो.
मोती तलाव येथील नारायण मंदिर शेजारी मुख्य रस्त्यावर बरोबर मधोमध हा खड्डा आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून पावसाचे पाणी साचून त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही आहे. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ तो बुजवावा अशी मागणी केली जात आहे. गेले अनेक दिवस पडलेल्या या खड्ड्याकडे नगरपरिषदेच दृर्लश झाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच इतरही रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नव्यानं केलेले हे रस्ते असून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा करणारे आहेत.