आडाळी एमआयडीसीत नवीन कंपनी येणार..?

Edited by:
Published on: September 20, 2024 14:25 PM
views 189  views

दोडामार्ग : आडाळी एमआयडीसी आता खऱ्या अर्थाने उद्योगांना चालना मिळणार आहे. चंदीगड येथील एका कंपनी या एमआयडीसीत 10 एकर जागेची आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत पाहणी केली. प्रथमदर्शनी कंपनीच्या संचालकांनी जागा पसंत केली आहे. फार्मा व सर्जिकल उद्योगासाठी आडाळी स्वतंत्र झोन ठेवण्या संबंधित म्हमंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच फार्मा क्षेत्रातील उद्योजकांची उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी बैठक होणार आहे. त्यानंतर त्याचे शिष्टमंडळ आडाळी येथे येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

त्यामुळे आता उद्योजक आडाळीत येण्यासाठी तयार आहेत. काही उद्योजक कंपन्यांनी येथील भूखंड घेतले असून लवकरच याठिकाणी या कंपन्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त प्रकल्प हे प्रदूषण विरहित आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता याठिकाणच्या विकासाला गती मिळणार असून 500 हुन अधिक युवक युवती या ठिकाणी नोकरीला लागणार आहेत. दोडामार्ग तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे जाणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आडाळी येथे केला.

आज मंत्री दीपक केसरकर यांनी आडाळी एमआयडीसी येथील प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या भूखंडांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. यावेळी दोडामार्ग प्रांताधिकारी वंदना खरमाळे, एमआयडीसी अधिकारी रेवणकर यांच्याशी मंत्री केसरकर यांनी चर्चा करत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याठिकाणी येणाऱ्या गुंतवणूक कंपन्यांना येथील जागेबाबत मुद्देसूद आणि व्यवस्थित माहिती द्या. योग्य ठिकाणी योग्य कंपन्यांना जागा मिळाली तर याठिकाणी उद्योजक येतील. पुढच्या आठवड्यात मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह इच्छुक कंपन्यांच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. त्यावेळी तुम्ही योग्य ती माहिती गोळा करून त्याठिकाणी सादर करा असे निर्देशही त्यांनी रेवणकर यांना दिले.

दरम्यान आडाळी एमआयडीसीत चंदीगड येथील एक औषध कंपनी सुमारे १० एकरमध्ये आपला प्रकल्प सुरु करणार आहे. त्यामुळे याठिकाणी सुमारे ५०० लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहितीही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. एमआयडीसीच्या माध्यमातून विकास होत असताना येथील हवा दूषित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. यासाठी जास्तीत जास्त प्रदूषण विरहित कंपन्या आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

यावेळी चंदीगड येथील औषध कंपनीचे व्यवस्थापक संचालक अंकुर मंगला हेही उपस्थित होते. त्यांनी या कंपनीबाबत माहिती देताना मंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या कंपनीला याठिकाणी कंपनी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आम्ही याठिकाणी हा प्रकल्प उभा करणार आहोत. याठिकाणी या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

यावेळी आडाळी सरपंच पराग गावकर, प्रवीण गावकर, शिवसेना युवा तालुकाप्रमुख भगवान गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुका प्रमुख मायकल लोबो, शहर प्रमुख योगेश महाले, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, विठू शेटवे, गुरू सावंत, सुमीत गवस सज्जन धाऊस्कर, नंदु गावकर, दाजी गावकर, नीळकंठ गावकर आदी उपस्थित होते.