टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळ आयोजित स्वरगंध' ही संगीत मैफील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 14, 2023 21:19 PM
views 219  views

कणकवली : कणकवली, टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दिपावली निमित्त सोमवारी सायंकाळी १३ नोव्हेंबर रोजी आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत 'स्वरगंध' ही संगीत मैफील आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून भावपूर्ण जाणते अंबाजी राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बहुसंख्य नागेश्वर मित्र मंडळ तसेच मोठ्या संख्येने श्रोते देखील उपस्थित होते.

दरवर्षी कणकवली, टेंबवाडी येथे  नागेश्वर मित्रमंडळ विविध समजोपयोगी उपक्रम राबवित असते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभत असतो. नवोदित कलाकारांना तसेच खेळाडूंना  व्यासपीठ मिळवून देण्यासाठी क्रीडा तसेच अन्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. दिवाळी हा सण आनंद, उत्साह घेऊन येतो. त्यामुळे यावर्षी दिवाळीनिमित्त संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.