भालावल नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

Edited by:
Published on: May 17, 2024 14:02 PM
views 190  views

बांदा : भालावल येथे नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. परदेशीया जितू उराव (वय २०, मूळ राहणार सुपा - झारखंड, सध्या रा. भालावल) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत भालावलं येथील उदय परब यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परदेशीया हा उदय परब यांच्या बागेत गेली ४ वर्षे काम करत आहे. आपल्या सहकारी कामगारासोबत तो बागेच्या लगत असलेल्या नदीत पाण्याचा पंप जोडत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. लगतच्या कामगारांने याची कल्पना मालक परब यांच्यासह स्थानिकांना दिली. सायंकाळी उशीरा स्थानिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी बी पालकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.