विवाहित महिलेचा शेर्पेतील दोघांनी केला विनयभंग

पोलिसात तक्रार दाखल
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 19, 2023 14:58 PM
views 638  views

कणकवली : शेर्पे-भटवाडी येथील सचिन मधुकर पांचाळ व हनुमंत आकाराम पवार यांच्याविरूद्ध गावातील एका विवाहित महिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा भादंवि ३५४ व ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पांचाळ व पवार यांनी महिलेची गावात बदनामी चालविली होती. यामुळे त्या महिलेचा पती त्यांना मारहाण करणार असे समजल्याने ते दोघे काल सकाळी १०.३० वा.च्या दरम्यान तिच्या घरी आले. नवरा दारात काम करीत होता. त्या दोघांना तिच्या घरी जाताच वादाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा तिच्याबद्दल अश्लिल शेरेबाजी केली. या प्रकाराबाबत तिने शुक्रवारी कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.