
दोडामार्ग : विजेचा लखलखाट आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मणेरी धनगरवाडी येथील विठ्ठल शाम गावडे यांच्या राहत्या घरावर सोमवारी मध्यरात्री वीज पडून चक्क बाथरूम मधील टाईल्स फुटून भिंतीचा काही भाग कोसळून पडला. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने विठ्ठल गावडे व त्यांची पत्नी बालबाल बचावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री विजेचा लखलखाट व व ढगांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु होता. अचानक 11.00 वाजण्याच्या सुमारास एक विजेचा लोळ बाथरूमच्या खिडकीतून आता घुसला आणि बाथरूम मधील टाईल्स फुटली तसेच विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे माहिती देण्यात आली आहे.