
चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामपूर घाटी मध्ये परतीच्या पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर माती आली. तातडीने तेथील माती काढण्याचे काम सुरू केल्याने वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. सध्या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी वीज पडून जीवित हानी सुध्दा झाली आहे. याच परतीच्या पावसामुळे गुहागर विजापूर महामार्गावरील रामपूर घाटीत अचानक दरडीचा काही भाग मातीसह कोसळून रस्त्यावर माती आणि दगड घरून झाली आले. मात्र, तात्काळ या घटनेची दखल घेत जेशिबिने माती काढण्याचे काम केल्याने घाटीतील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. परंतु, या घाटीत दरड कोसळण्याचा अशाच पाऊस पडला तर पुन्हा जिथे दरड कोसळली आहे तो भाग पुन्हा मातीसह खाली येऊ शकतो. याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.