
सिंधुदुर्गनगरी : २०२४ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२५ या नव वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गनगरी येथील टाऊन पार्क मध्ये मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत जल्लोख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील अमोल ग्रुप , सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण रहिवाशी संघ,जिल्हा परिषद कर्मचारी निवासी संकुल आणि जिल्हाधिकारी निवासी कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील टाऊन पार्क मध्ये ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जल्लोष कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सुरुवातीला लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स होणार आहेत ,त्यानंतर डॉग शो , विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि १२ वाजता २०२४ या सरत्या वर्षाला निरोप देऊन
फटाक्यांच्या आतिषबाजीत २०२५ या नव वर्षाचे स्वागत केले जाणार आहे सिंधुदुर्गनगरी व पंचक्रोशी मधील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अमोल ग्रुप तर्फे करण्यात आले आहे रेकॉर्ड डान्स व इतर कार्यक्रमासाठी परेश परब ९४२३३०१४७९ व आदेश नाईक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.