
सावंतवाडी : संततधार पावसामुळे भटवाडी येथील वेधशाळेच्या समोरील शंभर फूट संरक्षक भिंत कोसळली आहे. यात वेदशाळेचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी धाव घेत रस्त्यावर पडलेले चिरे बाजूला केले. काल दुपारी ही घटना घडली. दरम्यान याबाबत तात्काळ दखल घेणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचे वेध पाठशाळेचे अध्यक्ष बाळ पुराणीक यांनी आभार मानले.