थरारक ! खोल समुद्रात हायस्पीड बोटीची फायबर बोटीला धडक

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 20, 2024 09:04 AM
views 437  views

मालवण : सिंधुदुर्ग मालवण 12 वाव खोल समुद्रात शुक्रवारी मध्यरात्री  जीवघेण्या संकटाचा थरारक अनुभव मालवण येथील आशा मोहन शिरसाट यांच्या विशवेश्वर प्रसाद Ind, mh, mm, 05 3052 मासेमारी  बोटीवरील खलाशांनी अनुभवला.  समुद्रात नांगरावर उभ्या असलेल्या बोटीला परराज्यातील हायस्पीड बोटीच्या समूहातील एका बोटीने धडक देत बोटी पळून गेल्या. 


या धडकेत शिरसाट यांच्या फायबर बोटीचे मोठे नुकसान झाले. बोट कालच मासेमारीसाठी समुद्रात गेली असल्याने डिझेल भरलेले 4 बॅरल होते. बोट कलंडण्याची स्थिती निर्माण झाली. समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील 3 डिझेल भरलेले बॅरल व जाळी समुद्रात टाकण्यात आली. बोटीवरील वजन कमी करण्यात आले. खलाश्यानी मालवण येथे संपर्क साधला. मालवण येथील सुनील खंदारे व अन्य सहकारी अन्य बोटीने तातडीने समुद्रात रवाना झाले. घटनास्थळी पोहचून त्या बोटी वरील खालशी यांना आपल्या बोटीवर सुखरूप रित्या आणण्यात आले.  ती बोटही बांधून एका बाजूने कलंडलेल्या स्थितीत सकाळी किनाऱ्यावर आणण्यात मोठ्या प्रयत्नातून यश आले.


अश्या स्वरूपात हायस्पीड बोटिंचा हा हल्ला कधीही होऊ शकतो तरी याबाबत राज्य शासन, गृह विभाग, सागरी सुरक्षा यंत्रणा यांनी गंभीर दखल घ्यावी. कठोर करवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली जात आहे.