
सावंतवाडी : नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी गव्यांच्या कळपाने हजेरी लावली. शिरोडा नाका परिसरात भरवस्तीत दिवसाढवळ्या हे गवे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरात भरवस्तीत गवे येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नरेंद्र डोंगर परिसर, माठेवाडा, बाहेरचावाडा, माजगाव, मळगाव या परिसरात या गव्यांच वास्तव्य आहे. अनेक अपघात देखील आजवर झाले आहेत. त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वनपरिक्षेत्र सावंतवाडी कार्यालया खालीच गव्यांनी दहशत निर्माण केली आहे.