वेंगुर्लेतील 'त्या' कुटुंबियांना दिला मदतीचा हात !

वाढदिनी युवा उद्योजक विराग मडकईकर यांचा स्तुत्य उपक्रम !
Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 20:28 PM
views 456  views

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला शहरातील एका कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची आहे. तसेच त्यांच्या घरात काही नसल्यानं व गरिबी पदराशी असल्यानं ते कुटुंब उपाशी राहत होते. या कुटुंबीयांसाठी वेंगुर्ल्यातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी पुढे सरसावत उपाशी असलेल्या या कुटुंबाला जीवनावश्यक सामान देत खाकीतील माणुसकीच दर्शन घडवून दिलं होतं. तर वेंगुर्ल्यातील या कुटुंबियांला मदत करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केलं होत. 


या आवाहनाला  प्रतिसाद देत भाजपचे बुथ प्रमुख, एस.एम. मडकईकर सुवर्णकारचे युवा उद्योजक विराग मडकईकर यांनी वाढदिवसानिमित्त त्या कुटुंबातील व्यक्तींना भेट दिली. त्या कुटुंबातील व्यक्तींना जीवनाश्यक वस्तू त्यांनी सुपुर्द केल्या. महिनाभर पुरेल इतकं राशन सामान त्यांनी या कुटुंबाला देत आधार दिला. सेवाभावातून वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा उद्देश होता‌. दरवर्षी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी मदत कार्य करून ते आपला वाढदिवस साजरा करतात. मात्र, वेंगुर्ला पोलिसांनी केलेल्या या आवाहनानंतर त्या गरीब कुटुंबाच्या मदतीला ते धावून गेले.