
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने दिव्यांगावर मात करून राज्यात दुसरा आलेल्या कुणाल सूर्यवंशी याला वॉकर भेट स्वरुपात देत त्याच्या जिद्दीला सलाम करण्यात आला. दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनण्यात मदत व्हावी या उद्देशाने राज्य पाठ्यपुस्तक तयार केलेले नवे विषय घेऊन दहावीची परीक्षा दिलेला महाराष्ट्रातील चांगल्या गुणांनी उतीर्ण झालेला हा विद्यार्थी आहे.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रेमानंद देसाई, सुरेंद्र बांदेकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, नंदू शिरोडकर आदी आदी उपस्थित होते.