आपातग्रस्त वरक कुटुंबीयांना शैलेश परब यांच्याकडून मदतीचा हात...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 28, 2023 19:06 PM
views 718  views

दोडामार्ग : कुडासे वानोशी येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून नुकसान झालेल्या वरक कुटुंबाला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख शैलेश परब यांनी आर्थिक मदत केली आहे.

आपतग्रस्त वरक कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत शैलेश परब यांनी ही मदत सुपूर्त केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समनव्यक बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. संपदा देसाई, लक्ष्मण आयनोडकर उपस्थित होते. यावेळी परब व शिवसेनेने वरक कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत आर्थिक मदत सुपूर्त केली आहे.