
सावंतवाडी : सावंतवाडी येथील राजवाडा येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजप युवा नेते, युवा उद्योजक तथा हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत ह्या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी सुधीर आडीवरेकर, उमेश कोरगावकर, युवराज लखमराजे भोसले, तेजस माने, दिलीप भालेकर,अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, सुनील पेडणेकर, आशीष सुभेदार, राजू कासकर आदी उपस्थित होते. विशाल परब यांच्या हस्ते यावेळी ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवप्रेमीनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग घेतला होता.