बहुचर्चित आडाळी एमआयडीसीसाठीच्या लाँग मार्चला भव्य सुरुवात | शेकडो जणांचा सहभाग

महिलांची उपस्थिती लक्षणीय
Edited by: संदीप देसाई
Published on: August 20, 2023 11:18 AM
views 150  views

दोडामार्ग | संदीप देसाई : सुरू करा सुरू करा आडाळी MIDC सुरू करा, रोजगार आमच्या हक्काचा.. आम्ही तो मिळविणारच..नको घोषणा, नको बैठका उद्योग सुरू करा, हाच आमचा हेका?  अशी जोरदार घोषणाबाजी करत आडाळी औद्योगिक क्षेत्र त्वरित कार्यान्वित करा या मागणीसाठी अखेर बहुचर्चित भव्य 'लॉन्ग मार्चला'  प्रस्तावित आढळी एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावरून सुरुवात झाली आहे.

हा भव्य लॉंग मार्च अडाळी मोरगाव येथून बांद्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. लॉंग मार्चमध्ये दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. तर लाँग मार्चमध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग असल्याने या लॉंग मार्चला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चोख पोलीस बंदोबस्त.. मात्र शिस्तबद्ध रीतीने आडाळी एमआयडीसी लोकाधिकार  lकृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या लॉंग मार्चला रोजगाराच्या प्रतिष्ठित असलेल्या शेकडो जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  दरम्यान या लॉंग मार्चला सर्वपक्षीय नेते मंडळींनी जरी पाठिंबा दिला असला, तरी प्रत्यक्षात आज मात्र आडाळी येथून मोर्चा सुरू होताना या लॉंग मार्चमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या वरचष्मा दिसून आला.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांसह आडाळी एमआयडीसीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणारे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी त्यांच्या समवेत राजन म्हा, सुधीर दळवी, प्रमोद कामत यांचा प्रत्यक्ष सहभाग या लॉंग मार्चमध्ये दिसून आला.  लॉंग मार्च आयोजन करणारे औद्योगिक क्षेत्र विकास लोकाधिकार कृती समितीचे पदाधिकारी यांनी सुरुवातीला हा लाँग मार्च पक्षविरहित असल्याचे जाहीर केलेले असल्याने या लॉंग मार्चमध्ये सर्वसामान्यांचा ही सहभाग प्रामुख्याने आढळून येत आहे.  शेकडोंच्या संख्येने आडाळी येथून निघालेला लॉन्ग मार्च काही तासातच बांदा येथे धडकणार असून लॉंग मार्चचा तेथील समारोप पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे.