माडखोल डुंगेवाडीत नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

श्री भराडी देवी युवा कला क्रीडा मंडळाचे आयोजन
Edited by: ब्युरो
Published on: October 15, 2023 16:34 PM
views 158  views

सावंतवाडी : नवरात्रीला आता सुरुवात झालीय. त्यामुळे उत्साहाच वातावरण पाहायला मिळतंय. याच औचित्य साधत माडखोल डुंगेवाडी येथील श्री देवी भराडी युवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी १५ ऑक्टोबरपासून २४ ऑक्टोबरपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मंडळाचं १९ वं वर्ष आहे.  


यानिमित्त रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता बुवा मंदार मेस्त्री (हळवल -कणकवली) आणि बुवा सत्यम परब (आंबेगाव) यांचे सुश्राव्य भजन, सोमवारी १६ ऑक्टोंबर रोजी रात्री ८:३० वाजता श्री सिद्धिविनायक भजन मंडळ (कोलगाव) यांचे भजन (गायिका जान्हवी राऊळ), मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता बाई पण भारी देवा आणि भारतातील साडेतीन शक्तीपीठे मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे, बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता भगवती ताबळेश्वर दांडिया ग्रुप (वेंगुर्ले) आणि नवदुर्गा दांडिया ग्रुप (धवडकी) यांचा दांडिया त्यानंतर दत्तप्रसाद फुगडी मंडळाची (सावंतवाडी) फुगडी, गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता सातपाटेश्वर दशावतार मंडळाचे  (निरवडे)  शुक्र मंगल युद्ध हे नाटक होणार आहे.


शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० ओमकार कला मंच (सावंतवाडी) यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा, शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता निवेदक शुभम धुरी सोबत खेळूया खेळ संगीत पैठणीचा कार्यक्रम, रविवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळा (वेंगुर्ले) चे नाटक, सोमवारी २३ ऑक्टोंबर रोजी रात्री ८:३० वाजता स्थानिक मुले व कलाकार यांचा डान्स, कॉमेडी, मिमिक्रीचा जल्लोष २०२३ कार्यक्रम, मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्अयाचं आवाहन श्री भराडी देवी युवा कला क्रीडा मंडळाने केले आहे.